“कॅप्टन खरातचा आणखी एक कांड! 6 महिने शोषण, सातवा गुन्हा दाखल… |

Rokhthok Maharashtra 2 0

अध्यात्म आणि धार्मिक सल्ल्याच्या नावाखाली सुरू असलेल्या धक्कादायक प्रकाराचा आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे…
नाशिकमध्ये अशोक खरात विरोधात लैंगिक शोषणाचा सातवा गुन्हा दाखल झाला आहे…यावेळी एका तरुणीने थेट खरातवरच गंभीर आरोप केले आहेत…
पीडित तरुणी आपल्या आई-वडिलांसोबत धार्मिक सल्ल्यासाठी खरातकडे गेली होती… मात्र, याच ओळखीचा फायदा घेत खरातने तिला आपल्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे…
जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या सहा महिन्यांच्या कालावधीत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं तिने सांगितलं आहे.

या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे —
गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप पुन्हा समोर आला आहे…
हीच पद्धत इतर पीडित महिलांनीही सांगितली होती…
याआधी पीडितेने खरातच्या ऑफिस बॉयवर तक्रार केली होती…
मात्र आता तपासात संपूर्ण कटामागे खरातच असल्याचा आरोप करण्यात आला आहे…
सध्या नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे…
एकापाठोपाठ एक सात गुन्हे दाखल झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे…
आणि या प्रकरणात अजूनही अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.