ठाकरेंना मोठा धक्का! 20 नगरसेवकांसह शिंदे गटात मेगा पक्षप्रवेश

Rokhthok Maharashtra 16 0

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून, तब्बल 20 नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
वरळी गावातील ठाकरे गटाचे माजी शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनीही आपल्या समर्थकांसह पक्षप्रवेश केला. “40 वर्षे पक्षासाठी काम केलं, मात्र उमेदवारी मिळाली नाही. परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय घेतला,” असे त्यांनी सांगितले.
तर रायगडच्या कर्जतमधील 20 नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश करत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत, शिवसेना एनडीएचा प्रमुख घटक पक्ष असल्याचे सांगितले आणि विकासाच्या राजकारणाला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.
राज्यातील राजकारणात या पक्षप्रवेशामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.