दीनानाथ रुग्णालय पुन्हा वादात! 6 वर्षांच्या चिमुरडीच्या मृत्यूने खळबळ

Rokhthok Maharashtra 18 0

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुन्हा एकदा गंभीर आरोपांमुळे चर्चेत आले आहे.
सहा वर्षांच्या प्रियदर्शनी बागडे या चिमुरडीला डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्व रिपोर्ट नॉर्मल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.

मात्र ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर अचानक मुलीची प्रकृती बिघडली आणि तिला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. काही वेळातच तिचा मृत्यू झाला.

 

पालकांचा आरोप आहे की, रुग्णालयाने सुरुवातीला माहिती लपवण्याचा प्रयत्न केला तसेच आर्थिक आमिषही दाखवले.

दरम्यान, शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल करता येणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.
या घटनेमुळे रुग्णालय प्रशासन आणि यंत्रणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.