नाशिक दिंडोरीत भीषण अपघात! कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू | 7 विद्यार्थ्यांचा अंत

Rokhthok Maharashtra 2 0

नाशिकच्या Dindori तालुक्यात भीषण दुर्घटना! स्नेहसंमेलन आटोपून घरी परतणारी कार थेट विहिरीत कोसळली. या अपघातात ७ विद्यार्थी आणि २ पालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
इंदोरे गावातील दरगोडे कुटुंबासह हे सर्वजण कारने परतत होते. रात्री १० वाजताच्या सुमारास शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली.
पाण्याने भरलेल्या उघड्या विहिरीत कार पडल्याने बचावकार्याला मोठा अडथळा आला.

 

तीन हायड्रा क्रेनच्या मदतीने मध्यरात्री कार बाहेर काढण्यात आली.
मात्र, तोपर्यंत सर्व ९ जणांचा गुदमरून आणि बुडून मृत्यू झाला होता.
या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.