पुणे काँग्रेसमध्ये नवी ऊर्जा! प्रशांत जगताप व दीप्ती चवधरींचा पदग्रहण सोहळा

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे शहर काँग्रेसमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. काँग्रेस भवन येथे नूतन शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि दीप्ती चवधरी यांच्या पदग्रहण समारंभाचा उत्साहात पार पडला. काँग्रेस नेतृत्वाच्या मान्यतेनंतर दोन्ही नेत्यांनी अधिकृतपणे जबाबदारी स्वीकारली.
या वेळी माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषदही पार पडली. नव्या अध्यक्षांनी पुण्यातील वाढती गुन्हेगारी, वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि महागाईसारख्या प्रश्नांवर भाजप सरकारवर जोरदार टीका केली. “पुणेकर अनेक समस्यांनी त्रस्त आहेत आणि या परिस्थितीला धोरणशून्य सत्ता जबाबदार आहे,” असा आरोप त्यांनी केला.
तसेच बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या अडचणी जनतेसमोर प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार नव्या नेतृत्वाने व्यक्त केला. काँग्रेसने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी जीवापाड मेहनत करू, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या पदग्रहण सोहळ्यास काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.