पुण्यात पत्नीवर अमानुष अत्याचार; गुप्तांगावर ॲसिड ओतल्याचा आरोप

Rokhthok Maharashtra 1 0

पुण्यातील उरुळी कांचनमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
चारित्र्याच्या संशयातून आणि मुलगा होत नसल्याच्या विकृत मानसिकतेतून एका नराधम पतीने आपल्या २४ वर्षीय पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड ओतल्याचा आरोप आहे.

इतकंच नाही, तर गंभीर जखमी अवस्थेत तिला तब्बल १५ दिवस घरात कोंडून ठेवण्यात आलं. कोणतेही उपचार न दिल्याने महिलेची प्रकृती चिंताजनक बनली.

अखेर पीडित महिलेने माहेरच्यांशी संपर्क साधत सुटका करून घेतली.
यानंतर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, ॲसिड हल्ला आणि घरगुती हिंसाचाराचे गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे.

या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.