पुण्यात पोलीस आयुक्तांचा इशारा फेल? | अवैध धंदे पुन्हा जोरात | हप्तेगिरीचा आरोप

Rokhthok Maharashtra 1 0

पुण्यात अवैध धंद्यांवर कारवाईचा इशारा… पण प्रत्यक्षात काहीच बदल नाही?
हा प्रश्न आता नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत.
पुणे पोलीस आयुक्त Amitesh Kumar यांनी रामटेकडी येथे स्पष्ट इशारा दिला होता—
48 तासांत गांजा, दारू, मटका असे सर्व अवैध धंदे बंद करा… अन्यथा कडक कारवाई होईल!
मात्र, या इशाऱ्याला काहीच परिणाम झालेला दिसत नाही.
कोंढवा, वानवडी, हडपसर, मुंढवा, काळेपडळ, फुरसुंगी, मांजरी आणि लोणी काळभोर या भागांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
स्थानिकांच्या मते, हातभट्टी, गांजा विक्री, मटका आणि गुटखा यासारखे धंदे खुलेआम सुरू आहेत.
इतकंच नाही, तर ड्रग्सही सहज उपलब्ध होत असल्याचं सांगितलं जात आहे.

 

सर्वात गंभीर आरोप म्हणजे—
हे सर्व धंदे ‘हप्तेगिरी’मुळेच सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचेच कथित पंटर या व्यावसायिकांकडून नियमित वसुली करत असल्याचं बोललं जात आहे.
आयुक्तांनी पूर्वीच इशारा दिला होता की, ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असतील…
त्या ठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल.
मात्र, काही दिवस शिस्त दिसल्यानंतर पुन्हा परिस्थिती पूर्ववत झाल्याचा आरोप आहे.
यामुळे आता नागरिकांचा प्रश्न स्पष्ट आहे—
आयुक्तांचा आदेश फक्त कागदावरच राहणार का?
की खरंच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
पुणे पोलीस दलासाठी ही विश्वासार्हतेची मोठी परीक्षा ठरणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.