पोलीस ASI 35 हजारांची लाच घेताना रंगेहात……!

Rokhthok Maharashtra 1 0

पुण्यात पुन्हा एकदा लाचखोरीचा पर्दाफाश!
Anti-Corruption Bureau Maharashtra च्या पथकाने पुणे जिल्ह्यातील Paud Police Station येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे यांना ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे.
अपघातानंतर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात गाडी जप्त न करणे, अटक टाळणे आणि कायदेशीर कारवाईत मदत करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने ACB कडे तक्रार केल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

सध्या पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मुंबईतही मोठी कारवाई! Kurar Police Station येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे आणि एका PSI ला
लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं. गुन्हा नोंदवण्यासाठी ३ लाखांची मागणी, याआधी २ लाख घेतल्याचा आरोप आहे. भ्रष्टाचाराविरोधातील ही कारवाई
पोलीस खात्यातील लाचखोरीवर मोठा धक्का मानला जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.