मुंबईत कष्ट करून घर बांधलं, 8 दिवस राहायला आले अन् संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड

Rokhthok Maharashtra 12 0

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मुंबईत राहणारे दीपक चांदे, पत्नी शोभा आणि त्यांची दोन लहान मुले जय व पूर्वा हे उन्हाळी सुट्टीसाठी गावी आले होते. अनेक वर्षांच्या कष्टानंतर त्यांनी गावात नवीन घर बांधले होते आणि पहिल्यांदाच संपूर्ण कुटुंब त्या घरात आठ दिवस राहण्यासाठी आले होते.
उद्या मुंबईला परत जाण्यापूर्वी पाहुण्यांच्या भेटीसाठी दुचाकीवरून दुंडगे गावाकडे जात असताना आयशर टेम्पोची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर टेम्पो नाल्यात पलटी झाला. घटनास्थळी अत्यंत हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.