मुलगी असल्यास गर्भपात… काही महिलांना इतर ठिकाणी पाठवून अधिक पैसे उकळले जात होते.

Rokhthok Maharashtra 21 0

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेसमोरच बेकायदेशीर गर्भपाताचं रॅकेट सुरू असल्याचं उघड झालं आहे.सातारा परिसरातील जिल्हा परिषद शाळेजवळ हा संपूर्ण प्रकार चालत होता.प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दोन सख्ख्या बहिणी आणि एका पुरुषाला रंगेहाथ अटक केली आहे.या प्रकरणातील मुख्य सूत्रधार ज्योती पवार आहे, जी एक जीएनएम नर्स आहे.

ती पोर्टेबल मशीनच्या मदतीने गर्भलिंग तपासणी करत होती.फक्त १५ हजार रुपयांत हा बेकायदेशीर व्यवहार चालत होता.जर मुलगी असल्याचं समजलं, तर गर्भपात केला जात होता. काही महिलांना इतर ठिकाणी पाठवून अधिक पैसेही उकळले जात होते.या प्रकरणातील मुख्य आरोपी सध्या फरार आहे आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 👉 या रॅकेटमागे आणखी कोण आहे? आणखी मोठं जाळं उघड होणार का? हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.