लोणी काळभोर पोलीसांनी अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्यास ठोकल्या बेडया, २,३५,०००/- रु चा मुद्देमाल जप्त.

Rokhthok Maharashtra 1 0

लोणी काळभोर – पूर्व हवेलीतील थेऊर येथील चिंतामणी पोलीस स्टेशन, हद्दीत बेकायदेशीररित्या हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई करुन २ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोमनाथ दयानंद शेटप्पा( वय ३० वर्ष, रा.लोणी काळभोर, पाषाणकर बाग ,) असे अटक कऱण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.२९/०४/२०२५ रोजी सकाळी १:३० च्या सुमारास चिंतामणी चौकामध्ये एक इसम फोर व्हिलर कार न. एम. एच.१२- १६०६ या कार मधुन बेकायदेशीर दारूचे १० कॅन्ड मध्ये ३५० लिटर दारूची वाहतूक करत असल्याची माहिती विशाल बनकर यांना मिळाली सदर बातमी प्राप्त होताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप निरीक्षक रत्नदिप बिराजदार, पो. हवा. दिगंबर जगताप, पो. हवा विशाल बनकर, पो. हवा. संतोष बारगजे, पो. शि. सागर कदम यांनी सदर ठिकाणी सापळा रचुन अवैध गावठी दारु वाहून न्हेनारी हुन्डाई कंपनीची चारचाकी आय. २० गाडी पकडली. सदर कारवाई दरम्यान अवैध गावठी हातगट्टी दारुचे कॅन्ड वाहुन नेणारे इसम नामे सोमनाथ दयानंद शेटप्पा यास लोणी काळभोर पोलीसांनी ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधि. क. ६१५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई केली आहे. सदर कारवाई दरम्यान आरोपींकडुन एकुण २,३५,०००/- रुपये किंमतीचा माल जप्त करणेत आला आहे.

सदरची कामगीरी राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, पुणे शहर, अनुराधा उदमले, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पो. उप निरीक्षक रत्नदिप बिराजदार, पो. हवा. विशाल बनकर, पो. हवा. संतोष बारगजे, पो. हवा. दिगंबर जगताप, पो. शि. सागर कदम यांनी केली आहे.

अवैध धंद्यावरील या कारवायीमुळे लोणी काळभोर परिसरातील सर्व अवैध धंदे चालकांचे अवैध धंदे व अनाधिकृत कृत्यांना चाप बसविण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे.

भविष्यात अशाच प्रकारच्या अत्यंत प्रभावी व दर्जेदार कारवाया करुन अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटण करण्याचे उद्दीष्ठ असल्याची भावना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.