विरार हादरलं! RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून हत्या.

Rokhthok Maharashtra 1 0

पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे.
मंगळवारी शिरगाव परिसरात भरदिवसा दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली.

माहितीनुसार, आत्माराम पाटील हे मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासोबत शासकीय कामासाठी खदान परिसरात गेले होते.
यावेळी भालचंद्र पाटील, महेश पाटील आणि इतरांनी हल्ला केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

अनधिकृत बंगले, खदानी आणि जमीन बळकावण्याविरोधात तक्रारी केल्याचा राग मनात धरून ही हत्या झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणात १० ते १२ जणांचा सहभाग असल्याचा आरोप असून, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, ज्या वेळी घरात सत्यनारायणाची पूजा सुरू होती, त्याच वेळी आत्माराम पाटील यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.