श्री शिव महाकालेश्वर महादेव मंदिरात भव्य महाशिवरात्री महोत्सव उत्साहात साजरा….

Rokhthok Maharashtra 1 0

 पुणे येथे कॅम्प मधील मुक्तिधाम मशान भूमी धोबीघाट येथे श्री. शिव महाकालेश्वर महादेव मंदिरात भव्य महाशिवरात्र महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी उत्सव प्रमुख श्री. दत्तभक्त विक्रांत (अण्णा) विकास वशिष्ठ यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ भव्य शिवरात्री महोत्सवाचे आयोजन केले. यावेळी धोबी घाट मधील श्री. शिव महाकालेश्वर मंदिर सकाळी स्वच्छ धुवून साफसफाई करून विधीवत पूजा, होम हवन इत्यादी धार्मिक पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी पंचक्रोशीतील शिवभक्तांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती.

दुसऱ्या दिवशी महा भंडाराचे आयोजन करण्यात आले. दुपारी एक वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत महा भंडारा चालू होता. यावेळी पंचक्रोशीतील पुणे शहर व पुणे जिल्ह्यातील नामवंत प्रतिष्ठित शिवभक्त, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक ,अध्यात्मिक , इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली . यावेळी श्री. दत्तभक्त विक्रांत (अण्णा) विकास वशिष्ठ यांनी सर्वांचे स्वागत व आभार मानले.
त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील सर्व शिवभक्तांनी सहकुटुंब सहपरिवारासहित महाशिवरात्रीचा महा भंडाराचा प्रसाद घेतला. कार्यक्रमासाठी विक्रांत (अण्णा) विकास वशिष्ठ यांचे मंडळाचे कार्यकर्ते व इत्यादी सर्व कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी सर्व शिवभक्तांचे व सहपरिवाराचे श्री.दत्तभक्त विक्रांत ( अण्णा) विकास वशिष्ठ व त्यांच्या मातोश्री श्रीमती वंदनाताई विकास वशिष्ठ यांनी सर्वांचे आभार मानले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.