साधना विद्यालयास “पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार”

Rokhthok Maharashtra 1 0

हडपसर ,वार्ताहर. राष्ट्रीय हरित सेना योजनेमार्फत पर्यावरणविषयक उत्कृष्ट काम केल्याबद्दल व उत्कृष्ट उपक्रम राबविल्याबद्दल महाराष्ट्र शासन वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, पुणे यांच्यावतीने सन २०२४-२५ या वर्षाचा जिल्हास्तरावर साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेज, हडपसर
विद्यालयास प्रथम क्रमांकाचा “पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सामाजिक वनीकरण विभाग,पुणे येथील आशा भोंग, विभागीय वन अधिकारी व प्रज्योत पालवे, सहा.वनसंरक्षक यांच्या हस्ते विद्यालयाच्यावतीने पर्यावरण विभागाचे व राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख शैलेश बोरुडे, साधना खोत व राष्ट्रीय हरित सेनेतील विद्यार्थी यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर सामाजिक वनीकरण विभागातील सुरेंद्र काळे-विभागीय वन अधिकारी, जयश्री जगताप-सहा.वनसंरक्षक व तनुजा थोरात-सहा.वनसंरक्षक जैव विविधता कार्यालय,पुणे हे सर्व मान्यवर उपस्थित होते.

विद्यालयातील सर्व पर्यावरणपूरक उपक्रम हे विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,पर्यवेक्षिका माधुरी राऊत, विज्ञान विभाग प्रमुख डॉ.धनाजी सावंत, पर्यावरण विषयाचे व राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख शैलेश बोरुडे, साधना खोत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले जातात.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.