पुणे

कोयता घेऊन दशहत करणाऱ्या युवकास केले जेरबंद – काळेपडळ येथील घटना

पुणे ः प्रतिनिधी
सोशल मीडियावर कोयता असल्याची माहिती प्रसारित करून विनापरवाना शस्त्र बाळगून समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास दरोडा व वाहनचोरी पथकाने काळेपडळ येथे जेरबंद केले. त्याच्याकडून कोयता जप्त केला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.आकाश दिपक साटम (वय २०, रा. काळीवाघीण कॉलनी, गणपती चौक काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, शस्त्र बाळगण्यास बंदी आहे, तरीसुद्धा कोयता असल्याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित करून कोयता घेऊन काळेपडळ परिसरात फिरत असल्याची माहिती सहायक पोलीस फौजदार उदय काळभोर यांना सूत्रांकडून दरोडा व वाहनचोरी पथक-२ला मिळाली. त्यानुसार काळभोर यांनी दरोडा आणि वाहनचोरीविरोधी पथक-२चे पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांना दिली. त्यांच्या आदेशानुसार घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे कोयता आढळून आला. त्याच्याविरुद्ध आर्मअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x