पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुतनीकरण केलेल्या पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन

पुणे दि. 16. वानवडी, पुणे येथील नुतनीकरण केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. नुतनीकरण केलेल्या कार्यालयाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी करून माहिती घेतली.
यावेळी वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्री. जी. साईप्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण वाय. एल.पी.राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) पुणे वनवृत्तचे सुजय दोडल, पुणे (प्रा.) वनविभागाचे उपवनसंरक्षक राहूल पाटील, सहायक वनसंरक्षक पुण्याचे आशुतोष शेंडगे, पुण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वन विभागाचे मॉडेल कार्यालय
पुणे वनपरिक्षेत्र कार्यालय स.नं. ४९ साळुंकेविहार वानवडी येथील वनवसाहती मधील निवासस्थानाच्या इमारतीमध्ये स्थानांतरीत करण्यात आले आहे. निवासस्थान इमारतीचे मॉडेल परिक्षेत्र कार्यालयात रुपांतर करताना त्यामध्ये कार्यालयीन कक्ष, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष, तसेच वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचे दालन, जुने दस्तऐवज जतन करणेसाठी स्वतंत्र स्टोअर रुम, तयार करण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त वनसंरक्षणाचे वेळी वापरण्यात येणारी संसाधने ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेला कक्षाची निर्मिती करण्यात आलेली आहे. कार्यालयाच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x