पुणे

डॉक्टरांच्या तत्परसेवेमुळेच कोरोनावर मात सीमा सावंत ः जिल्हा काँग्रेसच्या वतीने एचएमएच्या डॉक्टरांचा सन्मान

पुणे ः प्रतिनिधी
कोरोना महामारीमध्ये नागरिक घरात आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्ससह त्यांचा स्टाफ २४ बाय ७ हॉस्पिटलमध्ये कार्यरत होता. त्यांनी कुटुंबीयांबरोबर समाजातील प्रत्येक घटकाची काळजी घेत उपचारपद्धती सुरू ठेवली, त्यामुळेच कोरोना महामारीवर मात करता आली, असे मत पुणे जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा सावंत यांनी व्यक्त केले.
हडपसर गाडीतळ येथील आबणे हॉस्पिटलमध्ये पुणे जिल्हा महिला कॉंग्रेसच्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा सावंत, हवेली तालुका महिला अध्यक्षा मंदाकिनी नलावडे, उपाध्यक्षा अंबिका शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हडपसर मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत चौधरी, उपाध्यक्ष डॉ मंगेश बोराटे, नियोजित अध्यक्ष डॉ. सचिन आबणे, माजी अध्यक्ष डॉ. मंगेश वाघ, डॉ. शंतनु जगदाळे, सहसचिव डॉ. अजय माने, सहसचिव डॉ. वंदना आबणे, माजी अध्यक्ष डॉ. अशोक जैन, कार्यकारिणी सदस्य डॉ. राजेश कोद्रे, डॉ. सत्यवान आतपाडकर, डॉ. मनीषा ससाणे, डॉ. अतुल कांबळे, डॉ. आनंद कांबळे, डॉ. संतोष सवाने, डॉ. सुनील बांदल, डॉ. आशिष ससाणे, डॉ. श्रुती गोडबोले उपस्थित होते.
यावेळी जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्ष सीमा सावंत आणि पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. मंगेश वाघ यांच्या हस्ते हडपसर विधानसभा काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र डॉ. आशिष ससाणे यांना देण्यात आले.
हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत चौधरी म्हणाले की, कोरोना महामारीमध्ये समाजाची आरोग्याची धुरा डॉक्टरांसह त्यांच्या स्टाफकडून दिवसरात्र सेवा देऊन सांभाळली. त्यांचा सन्मान, त्यांचे बंधुत्व दाखविण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीने दाखवून आम्हाला काम करण्याची उर्जा दिली. आपत्ती काळामध्ये आरोग्याविषयी येणाऱ्या संकटात अशा सन्मान-सत्कारांमुळे काम करण्यासाठी विशेष ताकद मिळते, असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे यांनी सूत्रसंचालन केले. मंदाकिनी नलावडे यांनी आभार मानले.