पुणे

धक्कादायक : ४० वर्षीय नराधम बापाचा नात्याला काळिमा : पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार – पोलिसांनी बेड्या ठोकल्या

वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. ४० वर्षीय नराधम बापाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नराधम आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पत्नी आणि मुलीसह एकत्र राहत होता. पत्नी सुरक्षा रक्षकाची नोकरी करून आपले कुटुंब चालवत होती. तर आरोपी हा काहीच काम करत नसे. तसेच त्याला दारूचे व्यसन आहे. दरम्यान, १ सप्टेंबर रोजी पीडित मुलीची आई कामावर गेली होती. त्यानंतर काही वेळाने पीडित मुलगी आजीकडे अंघोळीला गेली. दुपारच्या सुमारास ती घरात परत आली. तेव्हा, आरोपी नराधम बाप घरातच झोपलेला होता. हे पाहून पीडितेने घरातील काम करायला घेतले. तेवढ्यात मुलीला झोपायला ये असे आरोपीने म्हटले. पीडित मुलीने नकार दिला. त्याने मुलीला जबदस्ती करत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलीने हा सर्व तिच्या प्रकार आईला सांगितला. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात बाल लौंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.