पुणे

“मोदी साहेब जगायचं कसं..?” पुणेकरांची पंतप्रधानांना आर्त हाक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात आंदोलन.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संपूर्ण पुणे शहरातील आठही विधानसभा क्षेत्रात महागाईच्या विरोधात आंदोलन घेण्यात आले. “बहोत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार” अशी धूळफेक करत भाजपने केंद्रात सत्ता मिळवली. सत्तेत आल्यानंतर मात्र केवळ धनदांडग्या व्यापाऱ्यांच्या सेवेत मोदी सरकार व्यस्त झाले. इकडे प्रचंड महागाईने जनता हैराण झालेली असतानाही मोदी सरकारला जनतेच्या यातना दिसत नाहीत. केंद्र सरकारच्या या तुघलकी कारभाराचा व वाढलेल्या प्रचंड महागाईचा निषेध करण्यासाठी आज शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवाजीनगर येथे सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली,तर कॅन्टोमेंटमधील आंदोलनात सिलेंडरला हार घालून त्याची पूजा करण्यात आली.
प्रसंगी आंदोलनप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप शिवाजीनगर, कसबा व कॅन्टोमेंट येथे हजर राहत आपल्या भाषणात बोलतांना त्यांनी ” गेल्या ७ वर्षांच्या कालावधीत देशाचा कारभार सांभाळताना सर्वसामान्य नागरिकांना उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असून याचं कारण म्हणजे दैनदिन गरजेच्या वस्तूंमध्ये झालेली भरमसाठ वाढ अश्या परिस्थिती मध्ये मी देशाच्या पंतप्रधानांना विचारू इच्छितो की ” मोदीजी या महागाईमध्ये सर्वसामान्यांनी जगायचं तरी कसं..?” असा प्रश्न केंद्र सरकारला विचारला.

या आंदोलनात शिवाजीनगर येथे विधानसभा अध्यक्ष उदय महाले,माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके,राजू साने.
कसबा येथे माजी शहराध्यक्ष रवींद्रआण्णा माळवदकर, विधानसभा अध्यक्ष गणेश नलावडे,दिपक पोकळे,निलेश वरे, कॅन्टोमेंट येथे नगरसेवक प्रदीप गायकवाड,नगरसेवक वनराज आंदेकर विधानसभा अध्यक्ष आनंद सवाने, हडपसर येथे माजी महापौर वैशालीताई बनकर , नगरसेवक योगेश ससाणे,माजी उपमहापौर निलेश मगर,फारुख इनामदार,पूनम पाटील,वैष्णवी सातव विधानसभा अध्यक्ष डॉ.शंतनु जगदाळे,कार्याध्यक्ष संदीप बधे, अमर तुपे, कोथरूड येथे विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, नितीन कळमकर, स्वप्नील दुधाने,मिलिंद वालवडकर,ज्योती सूर्यवंशी, सुष्मा निम्हण,शुभम मातेले, खडकवासला येथे विधानसभा अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, कुणाल वेडे पाटील,स्वाती पोकळे, वडगांवशेरी येथे विधानसभा अध्यक्ष नानासाहेब नलावडे,सुहास टिंगरे,महेंद्र पठारे,शैलेश राजगुरू आदी उपस्थित होते.