पुणे

लोणी काळभोर पोलिसांनी दुचाकी चोरास ठोकल्या बेड्या

प्रतिनिधी :- अमन शेख।  लोणी काळभोर पोलिसांनी दुचाकी चोरास ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत त्यांची बाजारभावाप्रमाणे कि रु १,१०,००० इतकी असल्याची माहिती लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली आहे.

         लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात वाढलेल्या वाहन चोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहन चोरीचे संवेदनशील भाग तयार करून त्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या त्यानुसार लोणी काळभोर पोलीस पथक आपल्या परिसरात गस्तीवर असताना एका बातमीदाराकडून माहिती मिळाली की दिवेघाटात एक व्यक्ती मोटारसायकलवर घिरट्या घालत आहे त्यावर त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याचे नाव कैलास मीठू कदम रा. नायगाव ता हवेली असे सांगितले त्याच्याकडील मोटारसायकल संदर्भात माहिती घेतली असता ती लोणी काळभोर परिसरातून चोरल्याचे सांगितले तसेच अधिक तपास केल्यावर त्याने मार्केटयार्ड तळेगांव दाभाडे व शिरूर कासार जि बीड येथून एकूण चार मोटार सायकल चोरल्याचे मान्य केले याची बाजारभावाप्रमाणे किंमत रु १,१०,००० इतकी आहे.

         पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करीत आहेत