पुणे

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ‘चिटणीस’ पदी इकबाल मुनाफ सय्यद

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ‘चिटणीस’ पदी इकबाल मुनाफ सय्यद यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी इक्बाल मुनाफ सय्यद यांची पुणे शहर काँग्रेस कमिटीचे चिटणीस पदी नियुक्ती केली. नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.

इकबाल सय्यद रामटेकडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी इक्बाल सय्यद चॅरिटेबल
ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक उपक्रम आजवर राबवले आहेत. कोरोना काळात कोरोना ग्रस्तांना व नागरिकांना भरीव मोलाची मदत केली, या काळात अंत्यविधीसाठी कोणी पुढे येत नसताना इकबाल सय्यद यांनी मोठ्या प्रमाणात लोकांना मदत केली आहे. मुलांना शिक्षणासाठी, आर्मी भरती, पोलीस भरती व विविध प्रकारच्या शैक्षणिक सवलती मिळाव्यात तसेच आर्थिक मदत मिळावी म्हणून इकबाल सय्यद यांचा नेहमी पुढाकार असतो.

समाजातील तळागाळातील वंचित नागरिकांना केंद्रबिंदू मानून येथील सामाजिक प्रश्न सोडविण्याबरोबरच समाजातील, परिसरातील कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनएक अभियान राबविणार तसेच सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आगामी काळात कार्यरत राहणार व काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पुणे महानगरपालिकेत काँग्रेसचे नगरसेवक निवडून यासाठी जोमाने काम करणार आहे.
इकबाल सय्यद
चिटणीस – पुणे शहर काँग्रेस कमिटी