पुणे

थेऊर येथे झालेल्या क्रिकेट सामन्यात लोणी काळभोर पोलिसांनी पटकावले पहिले पारितोषिक

हवेली प्रतिनिधी :-अमन शेख

थेऊर येथे पार पडलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पुणे शहर पोलीस अंतर्गत लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या संघाने पहिले पारितोषिक मिळवत विजय चषक पटकावला यावर लोणी काळभोर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.

        हा रोमहर्षक सामना पाहण्यासाठी तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हडपसर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वासराव डगळे, थेऊर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी हे उपस्थित होते.

      क्रिकेट आपल्या रोमारोमात भरलेला प्रत्येकाला आनंद देणार आहे भारतीयांचा आत्मा म्हणजे क्रिकेट त्यामुळे मग तो गल्लीत असो किंवा आंतरराष्ट्रीय सामना प्रत्येक ठिकाणी सर्वच मनमुराद आनंद घेतात गेल्या दोन वर्षात स्थानिक पातळीवरील क्रिकेटला मर्यादा आल्याने हे क्रिकेट सामने घेता आले नाही परंतु कोरोना संसर्ग कमी झाल्याने अनेक ठिकाणी गाव पातळीवर क्रिकेट सामने आयोजित केले जात आहेत अशाच थेऊर येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात 32 संघाने सहभाग घेतला यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांच्या नेतृत्वाखाली लोणी काळभोर पोलीस यांचाही एक संघ सहभागी झाला सुरुवातीपासूनच त्यांनी आक्रमक खेळ दाखवल्याने हा संघ निश्चित अंतिम सामना गाठेल असं अनेकांना वाटले आणि त्याच प्रमाणे चुरशीचे सामने लढत लोणी काळभोर पोलीस संघ अंतिम सामना खेळला अतिशय चुरशीचा हा सामना कुंजीरवाडी संघासोबत झाला यात पोलीस संघाने ७० धावा मर्यादित षटकात केल्या कुंजीरवाडी संघास ७१ धावांचे लक्ष दिले सुरुवातीचे चार विकेट्स स्वस्तात गेल्यानंतर कुंजीरवाडी संघाकडून पाचव्या विकेटसाठी जोरदार खेळी झाली आणि हा सामना त्यांनी आपल्या पारड्यात वळवला परंतु लोणी काळभोर पोलीस संघाकडून शेवटच्या षटकार अतिशय संयमी गोलंदाजी करून हा सामना त्यांनी जिंकला. ह्या सामन्या मध्ये पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस नाईक प्रशांत गायकवाड, प्रशांत कळसकर, गणेश भापकर, अजिंक्य जोजारे, संदीप धुमाळ, प्रशांत सुतार, वसंत चव्हाण, समीर काकडे (सर्व लोणी काळभोर पोलीस स्टेशन), अमर साळवे ( वानवडी पोलीस स्टेशन ), नाना सोडनवर (मुंढवा पोलीस स्टेशन), प्रदीप न्यायनीत (खडक पोलीस स्टेशन) या संघाने सहभाग घेतला होता.
           थेऊर येथील चिंतामणी स्पोर्ट्स मैदानावर या सामन्याचे आयोजन रिपब्लिकन पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष मारुती कांबळे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले होते यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले