हवेली

बेकायदा सावकारी करणाऱ्यास ठोकल्या बेड्या आरोपींन कडुन एक कोटी सहा लाखाची बेहिशोबी मालमत्ता व इतर महत्वाचे दस्तऐवज जप्त

हवेली प्रतिनिधी :- अमन शेख

बेकायदा सावकारी करणाऱ्यास अटक; आरोपींन कडुन एक कोटी सहा लाखाची बेहिशोबी मालमत्ता व इतर महत्वाचे दस्तऐवज जप्त

बेकायदा सावकारी व्यवसायाच्या आधारे लोकांना वेठीस धरुन करोडो रुपये व मालमत्ता जमविणाऱ्या आरोपीस लोणी काळभोर पोलीसांनी गजाआड केले असुन आरोपींकडुन अजुन कोणी फसविले गेले असेल तर लोकांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आव्हान लोणी काळभोर पोलीसांनी केले आहे.
या बाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार विकास रामदास कटके( वय ३० वर्षे धंदा शेती रा. आष्टापुर माळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी स्वप्नील कांचन, राजाराम कांचन (रा. ऊरुळी कांचन )प्रशांत गोते( रा. भिवरी ता. हवेली जि. पुणे) व इतर दोन ते तीन अनोळखी इसम यांनी आपआपसात संगनमत करून सन २०१६ ते जानेवारी २०२२ पर्यंत स्वप्नील कांचन यांच्याकडुन व्याजाने घेतलेल्या सात लाख रुपयांचे व्याज म्हणुन कटके यांच्याकडुन रोख ४,६०,०००/- रुपये रोख घेऊन कटके यांना स्वप्निल कांचन यांनी प्रशांत गोते व त्यांच्या सोबतचे दोन अनोळखी साथीदार यांच्या साथीने बळजबरीने स्वप्नील कांचन यांच्या गाडीत टाकुन लोणीकाळभोर हवेली क्र. ६, सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये घेऊन जाऊन फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील कर्जाचे बेकायदेशीर व्याजापोटी (शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे) येथील १८ गुंठे जमीन प्रशांत गोते (रा. भिवरी, ता. हवेली जि. पुणे) यांच्या नावावर बळजबरीने करुन घेऊन फिर्यादी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
त्यानंतरही अजुनही व्याजाचे पैसे शिल्लक आहे असे सांगुन फिर्यादी यांची ऊर्वरीत वडीलोपार्जीत जमीन त्यांच्याकडील कर्जाचे बेकायदेशीर व्याजापोटी त्यांच्या नावे करुन देण्याकरीता फिर्यादी यांस तसेचत्याच्या कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन जाच करत असुन व्याज वसुलीसाठी सतत तगादा लावुन त्रास देत असल्याने फिर्यादी कटके यांनी त्यांच्या विरुध्द कायदेशीर तक्रार केल्याने लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन याबाबत वरिष्ठांना कळवुन यातील आरोपींच्या राहते घर व ऑफिसची झडती घेण्याकरीता पोलीस स्टेशनची तीन पथके तयार करून धडक कारवाई करुन आरोपी स्वप्निल राजाराम कांचन याच्या राहत्या घरातुन रोख रक्कम ५७,३८,५४०/- रु. सोन्याचे दागीने रु. ४८,६२,५०० रु. अशी एकुण एक कोटी सहा लाखाची बेहिशोबी मालमत्ता तसेच इतर महत्वाचे दस्तऐवज जप्त केले असुन यातील आरोपी स्वप्निल कांचन यास अटक केली असुन दि. ३०/०१/२०२२ रोजी म. न्यायालयात हजर केले असता त्यास दिनांक ०१/०२/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आले.
सर्व कारवाई डॉ. नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे , श्रीमती. नम्रता पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथील इतर अधिकारी व अंमलदार यांनी केला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे हे करीत आहेत.