हवेली

लोणी काळभोरमध्ये संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात साजरी

ता.हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

भक्ती व परमार्थाच्या मार्गाने समाजात जनजागृती करणारे महान संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने कदमवाकवस्ती लोणी काळभोर येथील बंजारा समाज एकत्र उपस्थित राहून सेवालाल महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

बंजारा क्रांतीदल विचारमंच अध्यक्ष पुणे श्री गोपाळ राठोड आणि बंजारा क्रांतीदल अध्यक्ष लोणी काळभोर कमलेश राठोड यांनी मोठ्या संख्येने बंजारा समाज एकत्र आणून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान लोणी काळभोर येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
लोणी काळभोर गावामध्ये बंजारा समाजातील महिलांनी कलश डोक्यावर घेऊन मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी शिवसेना हवेली ता. अध्यक्ष प्रशांत काळभोर,कदमवाकवस्ती ग्रा. पं. माजी सरपंच नंदू काळभोर, चित्तरंजन गायकवाड,दिपक काळभोर,विजय काळभोर,दत्तात्रय काळभोर, ग्रा. पं. सदस्य शरीफ पठाण इ.मान्यवर उपस्थित राहून संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कदमवाकवस्ती ग्रा. पं. माजी सरपंच नंदू काळभोर, प्रशांत काळभोर, चित्तरंजन गायकवाड यांच्या हस्ते संत सेवालाल म, हाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शांततेचे प्रतिक म्हणून विधीवत पुजा करून होम हवन प्रज्वलीत करण्यात आले.