पुणे

…विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

लोणी काळभोर ( कदमवाक वस्ती) समाजकार्याचा वारसा पुढे चालवत,सामाजिक बांधिलकी जपत सौ.मंदाकीनीताई नामुगडे,नासीरभाई पठाण तसेच भगवा प्रतिष्ठाण,लहुजी शक्ती सेना, जयहिंद ग्रुप,यांच्या आयोजनात व डॉ.मनोहर डोळे मेडिकल फाऊंडेशन च्या माध्यमातून 127 लोकांचे नेत्र तपासण्यात आले. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 9 लोकं पाठवणार आहेत.
या शिबिराला लोकांचा खुप चांगला प्रतिसाद मिळाला, बाबासाहेबांच्या जयंतीला खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या वेळी कदमवाकवस्ती च्या सरपंच गौरीताई चित्तरंजन गायकवाड,नवपरिवर्तन फौंडेशन महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष चित्तरंजननाना गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य नासिर खान पठाण, मंदाकिनीताई नामुगडे, रमेश कोतवाल,
अशोक शिंदे, लहुजी शक्ती सेनेचे विजयभाऊ सकट, युवा नेते ज्ञानेश्वर नामुगडे,अभिजीत (पप्पू )बडदे, सामाजिक कार्यकर्ते अन्वरभाई शेख,रणजीत माने, महेश राठी, सुरज मात्रे,प्रशांत चव्हाण, ऋषिकेश कदम,समीर शेख, निलेशभैय्या चांदणे, आणि समता नगर,इंदिरानगर,शिक्षक कॉलनी मधील महिलावर्ग उपस्थित होते.