पुणे

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल हवेली तालुका शिवसेनेच्या वतीने संतोष सोमवंशी यांचा सत्कार

हवेली प्रतिनिधी:-

अमन शेखकदमवाकवस्ती : महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या उपसभापतीपदी शिवसेना लातूर जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांची निवड झाल्याबद्दल हवेली तालुका शिवसेनेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना हवेली तालुका प्रमुख प्रशांत  काळभोर ,लोणी काळभोर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल काळभोर, उद्योजक माऊली काळभोर,पत्रकार पंढरीनाथ नामुगडे,पोलीस साईट उपसंपादक सौरभ लोणकर,कळंबा केसरी पै.मनोज काळभोर,उद्योजक निलेश काळभोर,सचिन काळभोर,नरेंद्र वलटे, केतन गायकवाड, बालाजी देशमुख,श्रीकांत गोरे,शिवसैनिक लक्ष्मीकांत राऊत उपस्थित होते.यावेळी बोलताना सोमवंशी म्हणाले की,या संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.