पुणे

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जंयतीनिम्मित्त बैलगाडा शर्यत

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

कदमवाकवस्ती : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जंयतीनिम्मित्त उरुळी देवाची शेवाळेवाडी(ता.हवेली) येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन शेवाळेवाडी ग्रामस्थ संघर्ष प्रतिष्ठाण,पुणे शहर तसेच शिवप्रेमी मित्र मंडळ,शेवाळेवाडी यांच्या वतीने करण्यात आले.यावेळी मांगडेवाडी येथील सुभाष मांगडे व उत्तम गवळी यांच्या बैलगाड्याने प्रथम क्रमांक मिळवला.अजित भेगडे यांनी दुसरा,आनंद रेटरे यांनी तिसरा,अरविंद धनावडे यांनी चौथा तर बिटु शेवाळे यांनी पाचवा क्रमांक पटकवला.कोरोनामुळे मागील वर्षापासुन सर्वच कार्यक्रम बंद होते.मात्र,आता सर्वत्र कार्यक्रम सुरु झाले आहेत.ग्रामीण भागामध्ये बैलगाडा शर्यतींना शेतकर्यामध्ये महत्त्वाचे स्थान असल्यामुळे बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी परिसरातील बैलगाडाप्रेमींनी गर्दी केली होती.या प्रसंगी माजी उपसभापती सचिन घुले,नगरसेवक प्रमोद भानगिरे,सरपंच संदीप बांदल,पंचायत समिती सदस्य राजीव भाडळे तसेच भाजपा नेते राजेंद्र भितांडे,उद्योजक योगेश शेवाळे,देविदास शेवाळे,उपसरपंच गणेश बबन शेवाळे हे उपस्थित होते.संघर्ष प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराचे उपाध्यक्ष सनी मोहन शेवाळे यांनी व शेवाळेवाडीतील सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष प्रयत्न केले.