हडपसर (प्रतिनिधी 6जून) छत्रपती शिवराय हे रयतेच्या कल्याणाचा विचार करणारा राजा होता. राष्ट्र निर्माता असलेल्या या लोककल्याणकारी राजाने 6 जून रोजी राज्याभिषेक केला. लोकशाही संस्कृतीची मूल्ये शिवशाहीत दडलेली आहेत. शेतकरी, स्त्रिया, रयतेच्या कल्याणाचा विचार करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय, असे विचार प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी मांडले. याप्रसंगी छत्रपती शिवरायांचे जीवन चरित्र प्रा. गजानन घोडके यांनी उलगडून दाखवले .या समारंभाचे औचित्य साधून गड किल्ल्याचे भव्य पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम इतिहास विभाग, सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय जगताप व उपप्राचार्य प्रा. संजय जडे, डॉ. दिनकर मुरकुटे डॉ. शिल्पा शितोळे, डॉ.रंजना जाधव सर्व विभागप्रमुख व शिक्षक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी या समारंभाला उपस्थित होते.
एस .एम. जोशी कॉलेजमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा
June 7, 20220

Related Articles
June 24, 20230
साधना विद्यालयास “प्रो प्लॅनेट पीपल” पुरस्कार प्रदान.
हडपसर,वार्ताहर.
नागरिकांनी पर्यावरण वाचविण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशै
Read More
October 1, 20220
शिक्षकांनी प्रशिक्षण घेऊन ज्ञानप्रवाही रहावे
हडपसर,वार्ताहार.
विज्ञान विषयाचे शिक्षक हे प्रयोगशील असतात त्यांनी कृती
Read More
August 9, 20230
“रोखठोक महाराष्ट्र न्यूज वेब चॅनलच्या विभागीय प्रतिनिधी पदी सतीश भिसे” हडपसर येथे कार्यक्रमात दिले नियुक्तीचे पत्र
हडपसर / पुणे (प्रतिनिधी )
हडपसर पुणे रोखठोक महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन हडपसर भा
Read More