पुणे

छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडचा निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी दिला राजीनामा

पुणे ः कन्हैय्यालाल यांची हत्या करणाऱ्या दोघांना राजसमंद (उदयपूर) पोलिसांनी अटक केल्यानंतर मुस्लीम गटाने पोलीस स्टेशनवर हल्ला केला. त्यामध्ये एका पोलीस कॉन्टेबलच्या मानेवर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. ही बाब मानवजातीला काळीमा फासणारी आहे, अशी भावना निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी व्यक्त केली. निवृत्त कर्नल पाटील यांनी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडचा (मानव जोडो अभियान) राजीनामा जिल्हाधिकारी यांना पोस्टाने पाठविला आहे.

छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष कर्नल पाटील म्हणाले की, यापूर्वी मुस्लीम ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष फिरोज मुलाला व काही सभासदांच्या संघटनांनी कोणतीही परवानगी न घेता एकत्र येत नुपूर शर्मा यांना अटक करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. ही बाब वेदनादायी असून, त्याची नैतिक जबाबदारी म्हणून मी राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.