पुणे

हडपसर चे सुपुत्र डॉ.शंतनू जगदाळे बनले आर्यनमॅन कझाकिस्तान येथे झालेल्या स्पर्धेत मिळविला किताब

पुणे (प्रतिनिधी)
कझाकिस्तान या देशाच्या राजधानी न्यूर सूलतान येथे आयर्नमॅन स्पर्धा पार पडली. या आर्यनमॅन स्पर्धेत विविध देशांतील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील स्पर्धकांमध्ये सहभागी हडपसरचे डॉ.शंतनू जगदाळे यांनी ही स्पर्धा पुर्ण केली व आयर्नमॅन हा किताब मिळविला.
हडपसरचे सुपुत्र डॉ. शंतनू जगदाळे यांनी स्विमिंग 3.8 किमी, सायकलिंग 180 किमी, रनिंग 42.2 किमी हे स्पर्धेसाठी निश्चित केलेले अंतर 14 तास 38 मिनिटात पूर्ण केले. त्यांनी ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे आयोजकांनी जाहीर केले. त्यांना आयर्नमॅन सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
डॉ.शंतनु जगदाळे हे हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे काॅंग्रेसचे अध्यक्ष आहेत. राजकीय क्षेत्रातील ही महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती असेल ज्यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
या स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून याआधी डॉ.जगदाळे यांनी कोल्हापूर येथे हाफ आर्यनमॅन स्पर्धा पूर्ण केली होती. यापुढे दक्षिणा आफ्रिका येथे काॅबरेंड (90km Run in 1गी 2hrs) ही स्पर्धा पूर्ण करण्याचा मानस आहे असे डॉ जगदाळे यांनी सांगितले.
या स्पर्धेच्या तयारीसाठी रनहोलिकस ग्रुपचे संस्थापक डॉ.योगेश सातव, आर्यनमॅन दशरथ जाधव, आर्यनमॅन राहूल झांजुर्णे यांचे डॉ.जगदाळे यांना मार्गदर्शन लाभले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार डाॅ.अमोल कोल्हे, खा. वंदना चव्हाण, खा. सुप्रिया सुळे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे ‌शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल डॉ. जगदाळे यांचे अभिनंदन केले आहे.