पुणे

हवेली तालुक्यातील कदम- वकवस्ती येथील स्टेशन चौका मध्ये एक कंटेनर च्या धडकेने दोन सख्या बहिणींचा जागीच मृत्यू

हवेली प्रतिनिधी :-अमन शेख

हवेली तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर परिसरात आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास २ सख्या शाळकरी बहिणींना एका कंटेनरणे जागीच चिरडले त्या मध्ये त्यांचा जागीच दुर्दवी मृत्यू झाला असून पूर्ण परिसरात या गोष्टीमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

धडकेत मृत्यु झालेल्या मुलीची नावे -गायत्री नंदकुमार शितोळे वय १७ रा.कवडी,पाठ व राजेश्री नंदकुमार शितोळे वय १० वर्ष लोणी काळभोर येथील विद्यालयात शिक्षण घेत होत्या. त्यांचा मामा पांडूरंग नवनाथ भिक्षे( वय ४२ वर्ष, रा. कवडी पाठ , ता. हवेली जि. पुणे .) हा त्यांना शाळेला सोडवण्यासाठी जात असताना लोणी स्टेशन चौक या ठिकाणी एका कंटेनर ने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली मोटरसायकल वरील मामा व मुली वेगवेगळ्या ठिकाणी पडल्यानंतर ट्रक मुलींच्या अंगावरून गेल्यामुळे त्या जागीच मृत्युमुखी पडल्या व मामाला कुठल्याही प्रकारे दुखापत झाली नाही. ट्रक चालक ट्रक घेऊन पळून गेला असता लोणी काळभोर पोलिसांनी त्याला पकडून अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर शहर पोलीस करीत आहे.

येथील स्थनिक नागरिकांनी वाहतूक शहर पोलीसांना वारंवार विनंती करून सुद्धा लोणी काळभोर स्टेशन परिसरात एक किंवा दोन वाहतूक कर्मचारी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत द्यावे असे वारंवार सांगितले होते, तरी देखील या गोष्टी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.तरी या गोष्टीला जबाबदार कोण ? असे नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.