पुणे

“अडीच वर्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते अव्वल स्थानी…”देशातील लोकप्रियतेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आठव्या स्थानावर… मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्या स्थानी तर शिंदे यांना केवळ 2.2 टक्के लोकांची पसंती

मुंबई (प्रतिनिधी )
भाजपच्या मदतीने शिवसेना फोडून राज्यात सत्ता स्थापन केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत दौऱ्यावर असतात व 24 तास काम करतात असे जाहीर केले जात असतानाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये मात्र त्यांचे नाव कमालीचे घसरले आहे,
देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री कोण या सर्वेक्षणमध्ये एकनाथ शिंदे यांची कामगिरी प्रचंड निराशा जनक ठरली आहे, सतत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असताना मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी लोकप्रियतेचा उच्चांक केला होता, या सर्व्हेमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

इंडिया टुडे सी ओटर ने केलेल्या ‘मूड ऑफ नेशन’ या सर्वेक्षण आदेशातील लोकप्रिय मुख्यमंत्री कोण याचे सर्वेक्षण करण्यात आले यावेळी दहा राज्यांमधील जनतेची राजकीय मते जाणून घेण्यात आली यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आठव्या क्रमांकावर आहेत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून केवळ 2.2% लोकांनी पसंती दिली आहे तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 39 टक्के लोकांनी पसंती दिली असून ते पहिल्या क्रमांकावर आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत पायाला भिंगरी असल्याप्रमाणे फिरत असतात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश, राजकीय सामाजिक कार्यक्रम आणि महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा या माध्यमातून एकनाथ शिंदे सतत लाईमलाईट मध्ये राहत आले आहेत तरी त्यांना अजून राज्यातील जनतेने स्वीकारलेले नसल्याचे चित्र आहे भाजपची साथ मिळूनही शिंदे जनतेत अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे तर दुसऱ्या एका सर्व्हेत मुख्यमंत्री शिंदे पहिल्या दहा मध्ये देखील स्थान मिळवू शकले नाहीत.

कोरोना साथीच्या काळात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामामुळे ते घराघरात पोहोचले होते फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद साधण्याची त्यांची पद्धत अनेकांना आवडली होती त्यामुळे ते लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत नेहमी अव्वल असायचे त्यांच्या कामाचे जागतिक संघटनेकडूनही कौतुक करण्यात आले होते पण एकनाथ शिंदे उद्धव ठाकरें समोर फिके पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपच्या साथीने एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केले असले तरी ते सामान्य शिवसैनिकांना रुजले नसल्याने महाराष्ट्रात एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाच्या विरोधी वातावरण दिसून येते त्यातच लोकप्रियतेने मध्ये त्यांनी निच्चाक गाठल्याने राज्यात त्यांनी घडवलेले सत्तांतर जनतेच्या पचनी पडलेले दिसत नाही.