पुणे

पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी १५ रस्त्यांचे सर्वेक्षण; शहर पोलीस,पुणे महापालिका, मेट्रो,आणी पीएमपीएल अधिकाऱ्यांची समिती स्थापन…!

पुणे: प्रतिनिधी:( रमेश निकाळजे )

पुणे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली असून, शहरातील अतिशय वर्दळीच्या १५ मार्गावरील कोंडी फोडण्यासाठी शहर वाहतूक पोलीस, महापालिका, मेट्रो, पीएमपीएलकडून वर्दळीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, सर्वेक्षणानंतर गर्दीच्या मार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत असे समितीकडून सांगण्यात आले.

पोलीस आयुक्तालयात मंगळवारी शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यासह पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएल), महामेट्रो, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), स्मार्ट सिटीचे अधिकारी आदी या वेळी उपस्थित होते.

या बैठकीत शहरातील शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली, शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे, काही भागांत मेट्रोचे काम सुरू आहे, अनेक भागांतील रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे, त्यामुळे शहरात ठिकठीकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र वाहतूक निरीक्षण बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलीस, महापालिका, पीएमपीएल, सोडविण्यासाठी मेट्रोसह अन्य संस्थांतील अधिकारी एकत्रित काम करणार आहेत , त्यानुसार पहिल्या टप्यात शहरातील गर्दीचे १५ रस्ते निवडण्यात येणार आहेत, या रस्त्यांची पाहणी तसेच टप्प्याटप्याने शहरातील सर्वेक्षण करण्यात येणार आहे,त्या रस्त्यांवरील बसथांबे, सिग्रल, पदपथ याबाबतची माहिती गोळा करून वाहतूक कोंडीची कारणे शोधून उपाययोजना करण्यात येणार आहेत.

पोलीस, महापालिका, पीएमपीएमएल, मेट्रोसह अन्य संस्थांमधील प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती तयार केली जाणार आहे, या समितीतील अधिकारी समन्वय साधून एकत्रित काम करणार आहेत,असे पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.