सातारा

राजधानी साताऱा येथे ‘महाराष्ट्र सन्मान’ पुरस्काराचे दिमाखात वितरण, खा.श्रीनिवास पाटील,आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले,राजा माने यांची उपस्थिती

सातारा/ प्रतिनिधी

राजधानी सातारा येथे महाराष्ट्र लाईव्ह न्युज चॅनल च्यावतीने ‘महाराष्ट्र सन्मान २०२३’ या दिमाखदार सोहळा संपन्न झाला ,या सन्मान सोहळ्यासाठी सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व वरिष्ठ संपादक माध्यम तज्ञ व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, भाजपा नेते मनोज दादा घोरपडे , कोरेगाव पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे उपस्थित होते. यावेळी सातारा, सांगली, कोल्हापूर,सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक ,साहित्यिक ,सांस्कृतिक ,कला ,क्रीडा ,शैक्षणिक,पत्रकारिता क्षेत्रातील १४ मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी यशवंत संभाजीराव पाटणे (प्रतिभावंत लेखक व व्याख्याते,डॉ. राजेंद्र नानासो सरकाळे (मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा), हिंदुराव शंकरराव पाटील (माजी कृषी सभापती, जिल्हा परिषद सातारा),विकास दिलीपराव थोरात ,रेल्वे लढयाचे प्रवर्तक (तारगांव, ता. कोरेगांव जि सातारा,श्रीमती संघमित्रा भिमराव ढापरे, सेवानिवृत्त मुख्यादयापिका (मु.पो.कापील ता कराड जि सातारा),मंगेश सुभाष पाटील,कोल्हापूर
(उपकार्यकारी अभियंता, ), कु. मोहित संतोष जगताप अथलॅटिक्स खेळाडू (निगडी ता.कोरेगांव जि सातारा), अजित सिताराम सांडगे उद्योजक,कराड (आगाशिवनगर, कराड जि. सातारा),राजू सर्जेराव शेळके (जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना,सातारा) जावळवाडी पो. वेणेगाव, ता.जि. सातारा, मारुती शिवराम मोळावडे सदस्य, सातारा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) मु.मोळावडेवाडी, पो.कुठरे, ता.पाटण जि.सातारा,ह.भ.प. डॉ. सुहास नथुराम फडतरे महाराज (कुमठे, ता.कोरेगांव जि.सातारा),उमेश हिंदुराव बांबरे दैनिक सकाळ सह मुख्य बातमीदार (मु पो भरतगांववाडी ता जि सातारा), सुहास जगन्नाथ माने(कृषी) मु.पो. राहुडे, ता.पाटण जि. सातारा,ओंकार तानाजी डांगे उपकार्यकारी अभियंता यांना महाराष्ट्र सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या जडणघडणीग सातारा जिल्ह्याचे योगदान खूप मोलाचे असून या सातारा जिल्ह्यातील कर्तृत्ववान १४ हिऱ्यांचा होणारा सत्कार म्हणजे राजधानी सातारा साठी गौरवशाली बाब आहे आपल्या सातारा जिल्ह्याचे नाव जगाच्या पातळीवर पोहोचवण्यासाठी आजच्या तरुण पिढीने पुढाकार घ्यावा यासाठी सर्वतोपरी आमचे सहकार्य राहील.
वरिष्ठ संपादक व माध्यम तज्ञ राजा माने यावेळी म्हणाले देशभरात बदलत्या तंत्रज्ञानामुळे मीडिया क्षेत्रात देखील मोठा बदल झाला असून डिजिटल मीडिया आता नवी झेप घेत आहे या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून नव्या दिशा देखील समाजाला मिळत आहेत राजधानी साताऱ्याचा इतिहास जगासमोर मांडण्याचे काम डिजिटल मीडिया नक्की करेल व तरुण पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कारासारखे विविध उपक्रम राबवावेत.

यावेळी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मनोजदादा, घोरपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य हिंदुराव पाटील ,प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, डाॅ.राजेंद्र सरकाळे, यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र लाईव्ह न्युज चॅनलचे संपादक विकास भोसले यांनी केले, सूत्रसंचालन वसुंधरा खांडके यांनी केले तर आभार प्रतिक भोसले यांनी मानले.

१४ हिरे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचे आयडाॅल

महाराष्ट्र सन्मान २०२३ पुरस्काराने सन्मानित झालेले १४ हिरे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील आयडॉल असून आपापल्या क्षेत्रात उच्च कामगिरी करणारे व्यक्तिमत्व आहे राजधानी सातारा मध्ये महाराष्ट्र सन्मान सोहळा होत असून ही परंपरा कायम राहावी यासाठी सर्वतोपरी सहकार्य सर्वांचे असेल असा विश्वास सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला.