पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ९ वर्षात पुण्याला काय दिले ? उद्घाटाने जाहिराती व भाषणे अंमलबजावणी शून्य

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी ते म्हणाले पंतप्रधान मोदी यांची नऊ वर्षाची कारकीर्द धुमधडाक्यात साजरी केली जात आहे नवा भारत नवी संसद याचे नारे दिले जात आहेत पण काँग्रेसचा शहर भाजपाला यानिमित्त एकच प्रश्न आहे तो म्हणजे पुणेकरांनी तुम्हाला भरपूर दिले पुणे शहराला तुम्ही काय दिले?
दोन खासदारकी सर्व विधानसभा मतदारसंघात आमदार महानगरपालिकेत 98 नगरसेवक केंद्रात राज्यात आणि मनपाती एक हाती सत्ता पुणेकरांनी उदार मनाने इतके राजकीय यश दिले त्या बदल्यात पुणे शहराच्या पदरी काय पडले फक्त भ्रष्टाचार महागाई बेरोजगारी केंद्र सरकारने जायका समान पाणीपुरवठा मेट्रो स्मार्ट सिटी पंतप्रधान आवास योजना आणखी काही योजना जाहीर केल्या त्या कागदावर असतानाच निविदानाच्या पातळीवर भ्रष्टाचार.

महापालिकेची सत्तेची पाच वर्षे निव्वळ भ्रष्टाचारात गेली हे सर्व पुणे शहराने पाहिले त्या भ्रष्टाचाराच्या भीतीने आता भाजपमहानगरपालिकेच्या निवडणुका घ्यायला तयार नाही काय केले घरपट्टीत महापालिकेने ठराव करून घेतलेली नागरिकांना दिलेली ४० टक्के सवलत यांनी काढून घेतली वसुली लावली ती सुद्धा चार वर्षापासून वीस ते बावीस हजार रुपयांच्या बोजा साधे घर असणाऱ्यापर्यंत पडत होता आंदोलने करावी लागली तेव्हा कुठे परत निर्णय फिरवला
आमदार रवींद्र धंगेकर यांनी हा विषय विधिमंडळात मांडून या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळवून दिला
भ्रष्टाचारी लोक या शहरातील नागरिकांचे गुन्हेगार आहेत असा काँग्रेसचा आरोप आहे यांना सत्ता दिली ती स्वतःसाठी वापरली केंद्र सरकारची ९ वर्ष कसली साजरी करता महानगरपालिकेतल्या सत्तेतला पाच वर्षाचाकामचा लेखा जोखा पुणेकरांना हिम्मत असेल तर द्या ?असे काँग्रेसने भाजपाला आव्हान दिले आहे.

तेरा वर्षाच्या कांग्रेस पक्ष च्या प्रयत्नांमुळे 2013 रोजी मेट्रो मंजूर झाली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ डिसेंबर 2016 रोजी पुणे मेट्रोची पायाभरणी केली तब्बल सहा वर्षांनी पूर्ण झालेल्या गरवारे ते वनाज या छोट्या मार्गाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले ३४.६ किमी चा मेट्रो प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मोदींनी कोणतेही आग्रह केल्याचे अजूनही ऐकिवात नाही मोदीजींनी पुणेकरांना उत्तर द्यावे की अजूनही मेट्रो का सुरू होत नाहीये स्मार्ट सिटी चे पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ जून 2016 रोजी बालेवाडी ते उद्घाटन केले झोपडपट्टी पुनर्वसन रस्ते फुटपाथ विकास रस्त्यावरील दिवस रोहित वाहतूक मला निसर्गाचे 14 प्रकल्प यात होते पुढील महिन्यात 15 जून रोजी पुण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्प म्हणून सात वर्ष होत आहेत कुठलाही अजूनही कुठलाही प्रकल्प मार्गी लागलेला नाही पंतप्रधान आवास योजना दुर्बल घटकांसाठी या योजनेतून सन 2022 पर्यंत मोफत घरे देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे योजनेअंतर्गत किती घरे बांधून दिली याची माहिती भाजपा का लपवत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन जाहिराती फोटो आणि बातम्या झाले की जणू विकास झाला असे भाजप दाखवते पुण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घोषणांचा सुकाळ आहे मात्र अंमलबजावणी चा दुष्काळ आहे पुण्याची शैक्षणिक प्रगती लक्षात घेऊन मंजूर झालेले आयआयएम नागपूरला गेली
श्री प्रकाश जावडेकर माहिती आणि नभोवाणी मंत्री असताना पुण्यातील नॅशनल फिल्म अर्किव ची स्वायत्तता संपली दूरदर्शन केंद्र मराठी बातम्या आकाशवाणी याची स्वायत्तता संपली
याप्रसंगी काँग्रेसचे सरचिटणीस प्रवक्तेरमेश अय्यर श्याबीर खान ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रशांत सुरसे शहर काँग्रेसचे चिटणीस चेतन अग्रवाल खानप्रांतिक प्रतिनिधी यशराज पारखे उपस्थित होते.