पुणे

“हडपसर हद्दीत कोयता गँगचा पुन्हा हैदोस, फुरसुंगीत जुन्या वादातून रस्त्यावरील फोडली वाहने, हडपसर पोलिसांकडून एक तिघांची बेड्या घालून धिंड”

https://fb.watch/mm0GbMfRjl/?mibextid=Nif5ozhttps://fb.watch/mm0GbMfRjl/?mibextid=Nif5oz

पुणे,  ः कोयता गँगचे शुक्लकास्ट संपता संपेना… फुरसुंगी (ता. हवेली)मधील गंगानगर येथे एका टोळक्याने जुन्या वादातून हातात धारदार कोयते आणि लोखंडी रॉडने रस्त्यावरील वाहने तोडणाऱ्यांना अटक केली. आकाश राजू गुजले (वय 22), अभयसिंग सिकंदर जुनी (वय 19), पृथ्वीराज साहिल आव्हाड( वय 19) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच, १५ वर्षाचा अल्पवयीन पोलिस रेकॉर्डवरील साथीदारही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी वैभवी सागर साळुंखे (वय 19, रा. हडपसर, पुणे) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे . पोलिसांनी सांगितले की, संबंधित आरोपी यानी जुन्या भांडणाचा राग मनामध्ये धरून तक्रारदार साळुंखे यांच्या राहत्या घराच्या परिसरात हातात धारदार लोखंडी शस्त्र व लोखंडी रॉड घेऊन आठ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आले. त्यानंतर संबंधित आरोपी यांनी तक्रारदार यांचे पती सागर साळुंखे यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या घरासमोर पार्क करण्यात आलेल्या तीन मोटारसायकलवर लोखंडी रॉडने मारून नुकसान करण्यात आले.यावेळी आकाश गुजले या आरोपीने त्याच्या हातातील धारदार शस्त्रे हवेत फिरवून ‘आमच्याशी कोणी पंगा घ्यायचा नाही ,नाहीतर जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन नागरिकांना शिवीगाळ करत ते निघून गेले आहेत.याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस. कवळे पुढील तपास करत आहे.