पुणेमहाराष्ट्र

मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त हवेली तालुका पत्रकार संघाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन…!

प्रतिनिधी -स्वप्निल कदम

पुणे – मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त हवेली तालुका पत्रकार संघाच्या वतीने आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. आरोग्य शिबिराचे उदघाट्न नाथाभाऊ उंद्रे ( जेष्ठ पत्रकार )यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा संघटक श्रावणी कामत,हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष- रमेश निकाळजे, उपाध्यक्ष- स्वप्नील कदम, सचिव- सुनील शिरसाट, कोशाध्यक्ष- संजय कुलूत, पत्रकार हल्लाबोल कृतिसमितीचे- गोरोबा पवार, संघटक / सदस्य- राम भंडारी, प्रीतम सावंत, सनी फलटणकर, संजय आवारे, शहाजी मिसाळ, मगर उडानशिव, सागर चव्हाण, ॲड.संतोष गायकवाड, फिरोज शेख,संजय कदम,लक्ष्मीकांत राऊत,तृप्ती कसबे, अपर्णा सोनालीकर तसेच सर्व सभासद पदाधिकारी यांच्यासह सर्व पत्रकार व नागरिक यांचे आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर, मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

यावेळी झालेल्या शिबिरात १८१ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. हे आरोग्य शिबीर विश्वराज हॉस्पिटल तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदाब तपासणी (बीपी) रक्तातील साखर (शुगर) तपासणी करण्यात आली. आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तसेच सर्व तालुक्यामधील विविध भागात पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी केल्याबद्दल परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्यासह विश्वस्त- किरण नाईक, अध्यक्ष- शरद पाबळे, कार्याध्यक्ष- मिलिंद अष्टिवकर, सरचिटणीस- मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष- विजय जोशी, राज्य प्रसिद्धीप्रमुख- संदीप कुलकर्णी, सह प्रसिद्धीप्रमुख -भरत निगडे, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष- अनिल वाघमारे, महिला आघाडी प्रमुख- शोभा जयपूरकर यांनी सर्व जिल्हा पत्रकार संघ, तालुका पत्रकार संघाचे अभिनंदन केले आहे. तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.