पुणेमहाराष्ट्र

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवर हडपसर ते उरुळीकांचन धोकादायकरित्या अवैद्य प्रवाशी वाहतुक जोरात वाहतूक पोलिसांचे जाणूनबुजून दुर्लक्ष…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : प्रतिनिधी – प्रवासी वाहतुकीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून विशिष्ट नियमावली लागू असून तीन व सहा आसनी रिक्षा मार्गावर प्रवाशांना सेवा देतात, परंतू या परिवहन विभागाच्या नियमांना केराची टोपली दाखवत जाणीवपूर्वक वाहतूक सुरक्षा नियमांना फाटा देत , इमानदारीने वसुलीचे काम करणाऱ्या त्या हप्तेखोर इसमास, एक ठराविक हप्त्याची रक्कम भरा व वाटेल तेवढे प्रवासी वाहनात भरून अवैध वाहतूक करा, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, गेल्या काही वर्षात शासनाने तीन आसनी रिक्षांना वाहतूक परवाने मोठ्या प्रमाणात दिल्याने रस्त्यावर या रिक्षा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.

तरुणांनी नोकरीं न करता व्यवसाय करून आपला रोजगार निर्माण करावा हा शासनाचा उद्देश आहे. परंतू अलीकडे ‘वाहतूक शाखेच्या हप्तेखोराकडून’ ” विनालिखित परवानगी घेऊन पुणे सोलापूर महामार्गावर प्रवासी वाहतूक करताना क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करण्याची रिक्षा चालकांची हिम्मत वाढलेली आहे. या सर्व गोष्टी मागचा खरा ‘सूत्रधार’ कोण? कोण या रिक्षा चालकांना अशी जीवघेणी वाहतूक करण्याची परवानगी देत आहे? आतापर्यंत आपल्या ध्यानात आलेच असेल, विशेषतः तीन आसनी वडाप रिक्षामध्ये सात ते आठ प्रवासी वाहतूक सर्रासपणे केली जाते.

यावर मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक वाहतूक शाखेच्या वतीने यावर कारवाई केली जात नाही, यासाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचे बोलले जात आहे. भ्रष्टाचार थांबविण्यासाठी केवळ सिंहगर्जना करून चालणार नाही तर यासाठी चोख कायदेशीर पावले उचलणे गरजेचे आहे. या विनापरवाना अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अनेक गंभीर दुर्घटना घडल्या असून त्यात अनेकांनी आपले व आपल्या परिजनांचे अनमोल जीव गमावले आहेत. भविष्यात आणखीन एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्या रिक्षाचालकास जबाबदार धरणार की नियमबाह्य वाहतुकीची मुक-संमती देणाऱ्या त्या “वाहतूक ‘वसुलीदारास? यातून मोठा यक्ष प्रश्न उपस्थित होत आहे.

एखाद्या दुर्गम भागात जाण्यासाठी वाहने उपलब्ध नसतील तर अशा ठिकाणी अनेक वेळेला अशा अधिक प्रवाशांची वाहतूक करताना आढळले तर कदाचित ते गैर असू शकते, परंतू पुणे-सोलापूर महामार्गावर सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तसेच पी, एम, पी, एल, बसेस त्याचप्रमाणे खाजगी रिक्षा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असताना देखील, एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक कशी व कोणाच्या कृपा-आशीर्वादाने चालते आणि यातून मिळणारा अवैध “महसूल” कोणा-कोणाच्या “तुंबड्यांमध्ये” जातो, याची सुजाण नागरिकांना चांगलीच कल्पना आहे.

महोदय तुम्ही समजता तेवढी जनता खुळी नव्हे, अवैध वाहतुकीस मूक- संमती देणाऱ्या त्या “वाहतूक वसुलीदार करणाऱ्या व्यक्तीची प्रशासनाने ‘Call Deatail ची संपूर्ण माहिती काढून सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. याविषयी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त श्री विजय मगर यांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने निवेदन देऊन या हप्तेखोरांनावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे.