पुणेमहाराष्ट्र

फुरसुंगी हडपसर येथे गाडी घासल्याच्या किरकोळ वादावरून झालेल्या खुनाच्या सहा आरोपींना हडपसर पोलिसांकडून अटक

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

हडपसर परिसरात किरकोळ अपघातानंतर नुकसान भरपाई मागण्यास गेलेल्या दुचाकी चालकाच्या खूनप्रकरणात पसार झालेल्या ६ आरोपीना हडपसर पोलिसानी सापळा रचून अटक केली आहे.

याप्ररकरणी विलास सुरेश सकट (वय ३८), कैलास सुरेश सकट (वय २०), प्रमोद ज्ञानेश्वर राखपसरे (वय १९), प्रशांत ज्ञानेश्वर राखपसरे (वय २१), सचिन संजय सकट (वय २९) व ज्ञानेश्वर प्रभू राखपसरे (वय ७८) यांना अटक करण्यात आले आहे. या घटनेत अभिषेक संजय भोसले (वय ३०) याचा खून झाला.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक भोसले घटनेच्या दिवशी दुपारी फुरसुंगी येथून दुचाकीवरून जात असताना विलास सकट याच्या वाहनासोबत अपघात झाला होता. या अपघातात अभिषेक यांच्या दुचाकीचा आरसा तुटला तसेच दुचाकी घासली गेली तेव्हा त्यांच्यात वादावादी झाली.

त्यानंतर अभिषेक व त्यांचा एक नातेवाईक रात्री चंदवाडी वस्तीत विलास सकट याच्याकडे अपघातात झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे मागण्यासाठी गेले तेव्हा टोळक्याने त्यांच्याशी वाद घालत त्यांच्यावर धारधार लोखंडी हत्याराने हल्लाकरून त्यांचा खून केला तर, नातेवाईकांवर देखील हल्ला करण्यात आला होता. खूनानंतर हे आरोपी पसार झाले होते. दरम्यान, पुण्यात दुचाकी घासल्यानंतर वाद आणि वादानंतर भरपाई मागितली म्हणून खून झाल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. हडपसर पोलिसांकडून या आरोपींचा शोध घेण्यात येत होता. मात्र, आरोपी गेल्या सात दिवसांपासून पसार होते. दरम्यान आरोपी हे बारामती व वाघोली परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने त्यांना दोन्ही ठिकाणांवरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. त्यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी रितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त साो पूणे शहर, रंजनकुमार शर्मा सो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. आर राजा सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मार्गदर्शनाखाली अश्विनी राख मॅडम, सहाय्यक हडपसर पोलीस ठाणे पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, रविंद्र शेळके सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. विद्या इगळे सो, पोनि. (गुन्हे), संदीप शिवले सो, पोनि. (गुन्हे) वांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, अजित मदने, समीर पांडुळे, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्ड, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, यांच्या पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.