पुणेमहाराष्ट्र

अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकास लोणी काळभोर पोलिसांनी केली अटक

प्रतिनिधि- स्वप्नील कदम

लोणी काळभोर, घरातील काम करण्यासाठी घरी बोलवुन विद्यार्थीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना हांडेवाडी (ता. हवेली) परिसरात पडली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी फरार झालेल्या नराधम शिक्षकाला अटक केली आहे. सुदर्शन पुंडलिक शेरमाळे (वय २०, सध्या रा. हांडेवाडी, ता. हवेली, मूळ रा. मनमाड, जि. नाशिक), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी १७ वर्षीय पीडित तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी हांडेवाडी येथे जुलै २०२३ मध्ये क्लासला आली होती. आरोपी हा त्या क्लासमध्ये शिक्षक म्हणून काम करीत होता. तेव्हा पीडित विद्यार्थिनी आणि आरोपीची ओळख झाली होती. आरोपीने घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन पोडितेला नोव्हेंबर महिन्यात एके दिवशी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बोलावून घेतले. पीडिता घरी गेल्यानंतर कपड़े धुत असताना आरोपीने जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित तरुणी घाबरल्याने तिने ही घटना कोणालाही सांगीतली नाही.हया गोष्टी चा फायदा घेऊन आरोपीने पुन्हा पीडितेवर दोनदा बलात्कार केला.

दरम्यान, पीडित तरुणीने याबाबत चाईल्ड हेल्पलाईनच्या मदतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपी सुदर्शन शेरमाळे याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन मोठ्या शिताफीने पकडले. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक, (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.