पुणेमहाराष्ट्र

धक्कादायक! पुण्यातला कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार ; गोळीबारात मोहळचा मृत्यू…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर दिवसाढवळ्या वर्दळ असणाऱ्या कोथरूड भागातील सुतारदरा परीसरात गोळीबार करण्यात आला आहे. मोहळवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. हा गोळीबार जुन्या वादातून झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. असे दिसत आहे. कोथरुडच्या सुतारदरा परिसरात मोहोळवर आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला.

दोन हल्लेखोर बाईकवरून फिरत होते ते शरद मोहळ घराबाहेर कधी पडतोय याची वाटच पाहत होते. शरद मोहळच्या लग्नाचा आज वाढदिवस असल्यामुळे तो सकाळपासून घरीच होता. शरद मोहळ दिडच्या सुमारास घराबाहेर पडला त्याचवेळी बाईकवरून तेथे फिरत असलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि ताबडतोब हल्लेखोर तेथून पसार झाले. हल्ल्यात शरद गंभीर जखमी झाला. त्याला तातडीनं कोथरूड मधील खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले. सदरील संपूर्ण घटना परिसरातील Cctv केमेऱ्यात कैद झाली असून पोलीस त्या फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.