पुणेमहाराष्ट्र

टर्मीन इंजेक्शनची विक्री करणाऱ्याला ठोकल्या बेड्या हड़पसर पोलिसांची कामगिरी : आयपीचे ३० बाटल्या केल्यासह ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि. ९ ः मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन) इंजेक्शनची विक्री करणाऱ्याला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. किरण विठ्ठल शिंदे (वय २१, रा. कृष्णकुंज अपार्टमेंट, भूमकरमळा, नऱ्हेगाव, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपीकडून आयपीचे ३० बाटल्या व मोटारसायकल असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

पोलिसांनी सांगितले की, आरोपी नशा करण्यासाठी मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन) बेकायदा इंजेक्शन ५०० रुपयांना विक्री करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याच्याकडे ३०बाटल्या व मोटारसायकल मिळून आली. स दर औषध केमिकल असून, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होऊन आरोग्याला गंभीर इजा पोहोचू शकते. आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुदळे करीत आहेत.

 

सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, संदीप शिवले यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अजित मदने, अमोल दणके, कुंडलिक केसकर, रामदास जाधव यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.