Uncategorizedपुणे

हडपसर पोलिसांची विशेष कामगिरी प्रशस्तिपत्र देऊन सन्मान ः पोलीस आयुक्तांची अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

पुणे ः हडपसर पोलिसांनी पोलीस दलात सर्वोत्तम कामगिरी केली, त्यांचा बुधवारी (दि. 6 एप्रिल 2022) साप्ताहिक आढावा बैठकीत विशेष प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास ढगळे यांचेही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी विशेष अभिनंदन केले. पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना जोमाने काम करण्यासाठी विशेष प्रेरणा मिळाली.

हडपसर पोलिसांनी ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022 या पाच महिन्यात 23 मालमत्तेच्या गुन्ह्यातील 673 ग्रॅम सोने, 87 गुन्ह्यातील 113 वाहने, 42 गुन्ह्यातील 107 मोबाईल, 3 रोख रक्कमांचे गुन्हे असा एकूण 155 गुन्ह्यातील एक कोटी 65 लाख 83 हजार307 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत केला. या कामगिरीबद्दल पोलीस अंमलदार गोविंद इरकर, सुदर्शना म्हांगरे यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले.
हडपसर हद्दीमध्ये वर्षानुवर्षे रेकॉर्डवर नसलेली बेवारस 249 दुचाकींचे चासी व इंजिन क्रमांक घेऊन आरटीओ कार्यालयाकडून 116 वाहनांच्या मालकांचे नाव-पत्ते मिळविले. त्यातील 8 वाहने चोरीच्या गुन्ह्यातील आढळून आली. या कामगिरीबद्दल पोलीस अंमलदार शरद धांडे, उमेश शेलार यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
हडपसर पोलीस स्टेशनमधील तपास पथकाने 10 फेब्रुवारी 2022 ते 31 मार्च 2022 दरम्यान 14 घरफोडी, 13 वाहनचोरी, 7 सराफांची फसवणूक, 3 जबरी चोरी, 2 इतर चोरी, एक आर्म अॅक्ट असे एकूण 40 गुन्हे उघडकीस आणून 42 लाख 90 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांच्या कामगिरीबद्दल प्रभार सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, अविनाश गोसावी, संदीप राठोड, अंकुश बनसुडे, श्रीकांत पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, सूरज कुंभार, रियाज शेख यांना प्रशस्तिपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.