पुणेमहाराष्ट्र

लग्नानंतर प्रेमसंबंध ठेवण्यास तरुणीने नकार दिल्यामुळे तरुणाकडून तरुणीला बेदम मारहाण; लोणीकाळभोर पोलिसांत गुन्हा दाखल…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : तरुणाने लग्नानंतरही माझ्याशी संबंध ठेव असे तरुणीला सांगितले. परंतु तुझे लग्न झाले आहे त्यामुळे मला तुझ्याशी काही देणेघेणे नाही असे तरुणीने तरुणाला सांगितल्याच्या रागातून तरूणीला तरुणाकडून डोक्यात दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले.सदरील घटना लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील माळीमळा येथील शेल पेट्रोल पंपाजवळ घडली आहे. विवाहानंतर देखील तरुणीला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. परंतु, तरूणीने नकार दिला असता रागातून या तरुणीला बेदम मारहाण करत तिच्या डोक्यात दगड मारल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात इम्रान हमीद शेख (रा. कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत २४ वर्षीय तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी आणि इम्रान यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. परंतु, इम्रान याचा पंधरा दिवसांपूर्वी विवाह झाला. त्याचा विवाह झाल्याने तरुणीने इम्रानशी बोलणे बंद केले. पण, तो संपर्क करत होता. मॅसेजही करत होता. तरीही तरुणी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. तरुणीने त्याला प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला.

पुणे-सोलापूर रस्त्यावर शेल पेट्रोल पंपाजवळ तरुणीला त्याने रात्री भेटायला बोलावले. तरुणी इम्रानला भेटण्यास गेली. तेव्हा त्याने तिने विवाह झाला असून प्रेमसंबंध ठेवणार नाही, असे सांगितले. त्यानंतर इम्रानने माझ्याशी प्रेमसंबंध ठेव, असे सांगून तिला धमकावण्यास सुरूवात केली. तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने तिला बेदम मारहाण केली. ती खाली पडल्यानंतर तिच्या डोक्यात दगड मारून तीला गंभीर जखमी केले आहे. तरुणीला मारहाण करून इम्रान तिथून पळून गेला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तरटे करत आहेत.