पुणे

“खोतीदार व संचालक मंडळात समेट घडवून आणावी, रयत शेतकरी संघटनेची पालकमंत्र्यांकडे मागणी” ” तोडगा काढण्याचे पालकमंत्री अजित पवारांचे आश्वासन “

पुणे (प्रतिनिधी )

मांजरी उपबाजारात खोतीदारांना मज्जाव केल्याने संचालक मंडळ व खोतीदार यांच्यात संघर्ष टोकाला पोहोचला आहे, खोतीदार व शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री अजित पवारांची भेट घेऊन निवेदन दिले, सभापतींना सांगून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले यावर संचालक मंडळ काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्व.अण्णासाहेब मगर मांजरी उपबाजारात 13 वर्षापासून खोतीदार व्यापारी व्यवसाय करत असताना नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळांनी शेतकऱ्यांना त्रास होतो हे कारण पुढे करत खोतीदारांना मज्जाव केला व त्यांचे परवाने रद्द केले त्यामुळे खोतीदार व त्यांच्यावर अवलंबून असणारे मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली वारंवार मागणी करून व निवेदन देऊनही संचालक मंडळांनी यावर अपेक्षित निर्णय घेतला नाही त्यामुळे संतप्त खोतीदारांनी शेतकऱ्यांचा माल काढणे बंद केले व असहकार आंदोलन सुरू केले, या आंदोलनाचा तीव्र फटका शेतकऱ्यांना बसल्याने शेतकऱ्यांनी संचालक मंडळाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे, रयत शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी खोतीदारांची भेट घेऊन त्यांचे गाऱ्हाणे ऐकले व शिष्टमंडळासह सर्किट हाऊस येथे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले, यावर अजित पवार यांनी सभापती यांना सांगून खोतीदारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. काही दिवसापूर्वी पालकमंत्र्यांनी सांगूनही संचालक मंडळाने यावर निर्णय घेतला नाही यामध्ये संचालक मंडळातील बेबनाव समोर आला आहे. त्यातच संचालक मांजरी उपबाजारात शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये वाद-विवाद निर्माण होईल अशी भाषणे करत असल्यामुळे मार्केटचे वातावरण दूषित झाले आहे.

या शिष्टमंडळात रयत शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास कोतवाल, उपाध्यक्ष रामदास पाटील बुवा कोतवाल, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हेमंत चौधरी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष महाडिक, पुणे जिल्हा अध्यक्ष पोपटराव महाडिक, पुणे जिल्हा सरचिटणीस टिके महाडिक, महिला अध्यक्ष कल्पना गव्हाणे पाटील, संपर्कप्रमुख शिरूर हवेली भानुदास शिंदे, हवेली तालुका उपाध्यक्ष आप्पा घोलप, खोतीदारांच्यावतीने बाळासाहेब भिसे, बाबा गव्हाणे, विलास भंडारी, पप्पु मोडक, राजाभाऊ महानवर, बादशहा आटोळे, भाऊसाहेब धुमाळ,प्रशांत आखाडे अनेक खोतीदार उपस्थित होते.

 

खोतीदारांबाबत निर्णय न झाल्यास आंदोलन छेडणार…
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने जुलमी फतवा काढून खोतीदारांना मांजरी उपबाजारात मज्जाव केला आहे हा निर्णय अन्यायकारक असून खोतीदारांकडून कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना त्रास दिला जात नाही पालकमंत्र्यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे जर यात सकारात्मक तोडगा निघाला नाही व संचालक मंडळाने फेरनिर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा रयत शेतकरी संघटना व खोतीदारांनी दिला आहे.