पुणेहडपसर

वृद्धांना मारहाण करून लुटणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

हडपसर पोलिसांची कामगिरी ः
पुणे, दि. २५ ः वयोवृद्ध नागरिकास रात्रीच्या वेळी कामावरून घरी जाणाऱ्यांना अडवून मारहाण करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. रोहितसिंग जितेंद्रसिंग टाक (वय १९) आणि कमलेश नरेंद्र भोरे (वय २२, रा. नवीन म्हाडा बिल्डिंग नं.१६, हिंगणेमळा, ससाणेनगर, रोड, पुणे) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. याप्रकरणी देविदास काळे (वय ५७) हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी देविकास काळे ड्युटीवरून घरी जात असताना काळेपडळ परिसरात स्कुटीवरून आलेल्या चोरट्यांनी अडवून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून तोंडाचा जबडा व डाव्या पायास फॅक्चर केले. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे चोरट्यांना ताब्यात घेऊन अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे करीत आहेत.

 

पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, संदीप शिवले, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतिबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुडंलिक केसकर, रामदास जाधव, अमित साखरे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.