पुणेहडपसर

पिस्तुल कॉक करून गोळ्या घालण्याची धमकी देणारा जेरबंद

हडपसर पोलिसांची कामगिरी ः विदेशी पिस्तुलासह सात जीवंत काडतुसे जप्त

पुणे, दि. ८ ः पिस्तुल कॉक करून अंगावर रोखून, मित्राच्या नादी लागू नका, एकेकाला येथे गोळ्या घालीन अशी धमकी देणाऱ्याला हडपसर पोलिसांनी अटक केली. प्रताप धर्मा टक्के (वय ३९, रा. के.डी. हिल्स, शेलार मळा, कात्रज, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सौरभ तानाजी काळे (वय २७, रा. विहारआळी, पंकज अपार्टमेंट, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. आरोपीकडून विदेशी बनावटीचे पिस्तुल आणि सात जीवंत काडतुसे जप्त केली.

 

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मित्रासह दुचाकीवरून जात असताना आरोपीच्या दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत भांडण केले. अंगावर धावून जात विदेशी पिस्तुल कॉक करून गोळ्या घालून एकेकाला गोळ्या घालण्याची धमकी दिली. आरोपीला अटक करून त्याच्याकडून सात जीवंत काडतुसे जप्त केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील डमरे करीत आहेत.