48 तासांत 4 धड नसलेले मृतदेह! बिहारच्या कैमूरमध्ये खळबळ

Rokhthok Maharashtra 15 0

बिहारच्या कैमूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि गूढ घटना समोर आली आहे. अवघ्या 48 तासांत तब्बल चार धड नसलेले मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

रामगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुर्गावती आणि कर्मनाशा नदी परिसरात शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले. काही अवयव पोत्यात भरून टाकण्यात आल्याचंही पोलिसांना आढळलं आहे.

घटनेची माहिती मिळताच कैमूरचे एसपी हरिमोहन शुक्ला आणि पोलिसांचं मोठं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी सर्व पुरावे गोळा करत तपास सुरू केला आहे.

मृतदेहांची अवस्था अत्यंत खराब असल्यामुळे ओळख पटवणं पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरत आहे. प्राथमिक तपासात एका पुरुष, एका महिला आणि एका चिमुकल्याचा मृतदेह असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या रहस्यमय मृत्यूंमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी नागरिकांना कोणतीही माहिती असल्यास पुढे येण्याचं आवाहन केलं आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.