नगरसेविका प्राची आशिष आल्हाट यांच्या वतीने भव्य होम मिनिस्टर स्पर्धा
प्रभाग क्रमांक 26 मधील हजारो महिलांची उपस्थिती,भव्य बक्षिसे
नगरसेविका प्राची आल्हाट माझ्या धाकट्या भगिनी, विकासकामांकरिता निधी देणार : आमदार योगेश टिळेकर
हडपसर (प्रतिनिधी)
शिरुर लोकसभा निवडणुकीत आपण 14 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांच्या जोरावर विजयाचा चौकार मारणार असलयाचा विश्वास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महंमदवाडी येथे बोलताना व्यक्त केला.
नगरसेविका प्राचीताई आशिष आल्हाट यांनी आपल्या नगरसेवकपदाच्या वाटचालीस 2 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व लोकसभा निवडणुकीच्या पर्शवभूमीवर भव्य होमिनिस्टर स्पर्धा व महिला मेळाव्याचे आयोजन केले होते,यावेळी उदघाटक या नात्याने खासदार आढळराव पाटील हे बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार महादेव बाबर,पुणे शहर उपप्रमुख समीर तुपे,शहर सहसंपर्क प्रमुख विजय देशमुख,महिला आघाडी अध्यक्षा संगीता ठोसर, नगरसेवक प्रमोद भंगीरे,आशिष आल्हाट,माजी नगरसेवक तानाजी लोणकर,शिवाभाऊ शेवाळे,दिलीप कवडे,नांना बारंगुळे,वीरभद्र गाभणे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते,
खासदार आढळराव यांनी यावेळी नगरसेविका प्राची आल्हाट यांच्या कामाचे कौतुक करून राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या विरोधात उमेदवार शोधण्याची धडपड करावी लागत असल्याची टीका केली.
आमदार योगेश टिळेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले ‘लहान वय असूनही प्राचिताईनी आपल्या राजकीय वाटचालीने लक्ष वेधून घेतले आहे, सभागृहात नागरिकांच्या प्रश्नांकरिता संघर्ष करणाऱ्या प्राची आल्हाट या माझ्या धाकट्या बहीण असून त्यांना विकासकामनकरिता मी निधी कमी पडू देणार नाही.
कार्यक्रमाच्या संयोजिका नगरसेविका प्राची आल्हाट यावेळी बोलताना म्हणाल्या’
सर्वसामान्य कुटुंबातील मुलीला प्रभाग क्रमांक 26 मधील सर्वधर्मीय मतदारांनी काम करण्याची संधी दिली,मागील 2 वर्षात विविध विकासकामे मार्गी लावली असून भविष्यात पाणी प्रश्न सोडवण्यासाठी विविध ठिकाणी सुरू असलेल्या टाक्या व नळ योजनांची कामे पूर्ण करन्यावर भर देणार आहे.
आशिष आल्हाट यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विकास तरुण मंडळ, माता रमाई महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले.
