पुणे

“स्व.दादा गुजर” यांच्या प्रवासातील पाऊलखुणा पवित्र आहेत – माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील; “स्व.दादा गुजर” स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार प्रदान

वानवडी / पुणे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या माध्यमातून आभाला एवढे काम करणाऱ्या डॉ.दादा गुजर यांनी कधी झोळी पसरली नाही, ओंजळ पसरली, आणि ओंजळ मधे बसेल तेवढेच घेतले, मळलेल्या वाटेवरून प्रवास केलेल्या दादांच्या उमटलेल्या पाऊलखुणा या पवित्र आहेत, असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या वतीने डॉ.दादा गुजर स्मृती प्रीत्यर्थ सामाजिक क्षेत्रातील. पुरस्कार मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ.अनिल अवचट आणि आरोग्य क्षेत्रातील. पुरस्कार हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे डॉ.शशिकांत व डॉ.शुभांगी अहंकारी यांना पाटील यांचे ५१ हजार रोख, पुस्तक, मानपत्र सह प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पद्मश्री डॉ.सुदाम काटे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एफ पाटील, उपाध्यक्ष सतीश अग्रवाल, सचिव अनिल गुजर, सहसचिव डॉ.राजेश पवार उपस्थित होते.
“आरोग्यातील प्रतिबंधात्मक सवयीमुळे ८५ टक्के आजार बरे होऊ शकतात, हे दादांनी ओळखले आणि पाणी स्वच्छता व जलसंधारण यासाठी मोठे काम उभारले”
डॉ.अनिल अवचट म्हणाले,” मुक्तांगण वयसनमुक्ती केंद्राच्या रूपाने पु. ल. देशपांडे यांचे स्वप्न पूर्ण झाले. बत्तीस हजार लोकांच्या घरात दिवा लागला. हे नुसते व्यसनमुक्ती केंद्र नाही, तर चांगला माणूस तयार करण्याचे केंद्र आहे.मुक्तांगणने कधी जाहिरात केली नाही, जरुरी पेक्षा धन कमी असेल तरच पावले चांगली पडतात.
यावेळी शशिकांत अहंकारी महणाले,”आरोग्य क्षेत्रात आजची आव्हाने व परिस्थिती बदलली आहे.कट प्रॅक्टिसने बाजारपेठ घेतली आहे.रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये मानवी सं वेदना निर्माण करणे गरजेचे आहे “डॉ.शुभांगी अहंकारी महणाले ,” स्त्रियांच्या वर होणाऱ्या हीं सेवर काही करू शकलो नाही तर आपण स्त्री आरोग्याचे कार्य करू शकणार नाही” मानपत्र संहिता लेखन व वाचन डॉ.गायत्री सावंत व डॉ.विद्या उंडाळे यांनी केले.
संस्थेच्या मुक्तांगण वस्तीगृहाच्या विद्यार्थिनी प्रेरणा खरात यांनी दादांबदल आत्मकथन केले. तर संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एफ.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक संस्थेचे सचिव अनिल गुजर यांनी केले. सुत्रसंचलन निता जमदाडे यांनी केले. आभार प्रकाश भापकर यांनी मानले.

0 0 votes
Article Rating
986 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments